Advertisement

एमपीएससी विद्यार्थ्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक तूर्तास रद्द

प्रजापत्र | Thursday, 23/02/2023
बातमी शेअर करा

पुणे-MPSC विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज शरद पवारांसह (Sharad Pawar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांना भेटणार होते. मात्र आजची ही भेट रद्द करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने आजची भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून MPSCच्या विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन सुरु आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेणार होतं. मागील चार दिवसांपासून पुण्यात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर यातून तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. मात्र ही बैठक अचानक रद्द करण्यात आली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला न जाता कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी आज दिवसभर पुण्यातच थांबणार असल्यान ही बैठक रद्द करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत सामान्य प्रशासन आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित राहणेही आवश्यक आहे.
अधिकृत नोटीस काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी माडंली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तेव्हा आम्हाला फक्त आश्वासन दिलं गेलं. पण अधिकृत नोटीस निघाली नसल्याची मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुणे शहरात दोन दिवस राहतात. मात्र, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटायला येत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement