महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर गुरुवारी शिंदे आणि ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. नबाम रेबिया निकालाचा फेरविचार करण्याच्या अनुषंगानेच तिसऱ्या दिवशीही सुनावणी झाली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, तर शिंदे गटाचे हरीश साळवे, जेठमलानी यांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर नबाम रेबिया निकालाचा फेरविचार करण्यासाठी प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवायचं की, नाही? याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे.
बातमी शेअर करा