Advertisement

शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ

प्रजापत्र | Tuesday, 07/02/2023
बातमी शेअर करा

मुंबई-शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी आहे. शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय. सरकारकडून जीआर प्रसिद्ध करून मानधनात वाढ करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात झालेली वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे.   
        प्राथमिक आणि उच्च प्राथमिकच्या शिक्षण सेवकांचं मानधन 6 हजार रुपयांवरुन 16 हजार रुपयांवर नेण्यात आलं आहे. माध्यमिकच्या शिक्षण सेवकांचं वेतन 8 हजार रुपयांवरुन 18 हजार रुपये करण्यात आलं आहे. तर उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक सेवकांचं वेतन नऊ हजार रुपयांवरुन 20 हजार रूपये करण्यात आलं आहे. राज्य शासनाकडून आजच याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा आज राज्य सरकारकडून जीआर काढण्यात आला. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी शिक्षक संघटना आणि शिक्षण सेवकांकडून वेळोवेळी मागणी केली जात होती. या मागणीनुसार लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा मानधन वाढीचा मुद्दा विधिमंडळात चर्चेसाठी घेतला होता.  उच्च न्यायालयाने देखील एका निवाड्यात निकाल देताना शिक्षण सेवकांच्या अल्पशा मानधनाविषयी आश्चर्य व्यक्त केले होते. अखेर आज जीआर काढून शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.  

 

Advertisement

Advertisement