बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील अंतर्गत वादामुळे काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला आहे.
आज बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. अशी माहिती स्वत: बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला दिली, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे आजच बाळासाहेब थोरात यांचा जन्मदिवस आहे. अजित पवार यांनी सांगितले की, आज मी फोन करुन बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हाच आपण काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती स्वत: बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला दिली.
विशेष म्हणजे नाना पटोले यांनी मात्र आपला बाळासाहेब थोरातांशी संपर्क होऊ शकला नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे आता थोरात-पटोले यांच्यातील वादासोबतच यातील राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही आता हळूहळू समोर येत आहे