Advertisement

मध्यमवर्गाला मोठा दिलासा

प्रजापत्र | Wednesday, 01/02/2023
बातमी शेअर करा

दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला आहे. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवून ती आता ७ लाख करण्यात आली आहे. यापूर्वी ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातून करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढावी अशी अपेक्षा अनेकांची होती. असे मत अर्थमंत्र्यांचेहि होते. त्यानुसार आता ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. 

Advertisement

Advertisement