एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीच्या दृष्टीने ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाची बाजू ऐकून घेतली होती. आजच्या सुनावणी ठाकरे गट आपली बाजू मांडणार आहे. यावेळी दोन्ही गटाचे नेते दिल्लीत उपस्थित आहेत. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हबाबत आज निर्णय होणार का? हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. याबाबतही आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे.
बातमी शेअर करा