Advertisement

हिंगोली भूकंपाने हादरल !

प्रजापत्र | Sunday, 08/01/2023
बातमी शेअर करा

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी या तीन तालुक्यातील गावात आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. भूकंपाच्या धक्क्यांच्या घटनेमुळं जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्ह्यात 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिली आहे. या भूकंपात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

हिंगोलीच्या वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यांमध्ये यापूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. पुन्हा आज सकाळी 4 वाजून 30 मिनिटाला 3.6 रिश्टर स्केल असा भूकंपाचा धक्का बसलेला आहे. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली. परंतु, या प्रकारानंतर वसमत, कळमनुरी, औंढा या तिन्ही तालुक्यातील 17 ते 18 गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. औंढा तालुक्यातील दुधाळा, जलालधाबा, राजापूर या गावात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत

Advertisement

Advertisement