अहमदाबादच्या शाहीबाग भागातील एका 11 मजली इमारतीच्या 7व्या मजल्यावर शनिवारी भीषण आग लागली. या अपघातात एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सर्वात धक्कादायक घटना म्हणजे बाल्कनीमध्ये ती सुमारे 25 मिनिटं वाचविण्यासाठी लोकांकडे विणवणी करित होती. पण तिला वाचवता आले नाही.
या घटनेचा व्हिडिओ समोर आले आहेत. त्याचबरोबर कुटुंबातील चार जणांचा जीव वाचला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ही घटना सकाळी 7.28 वाजता घडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद फायर ब्रिगेडला सकाळी ७.२८ वाजता कॉल आला. शाहीबाग येथील गिरधरनगर सर्कलजवळ असलेल्या ऑर्किड ग्रीन फ्लॅटच्या सातव्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.
प्राची बाल्कनीत अडकली, अन्य फ्लॅटमध्ये थांबले
आग लागली तेव्हा फ्लॅटमध्ये पाच जण होते. चौघे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. तर 15 वर्षीय प्राची खोलीत अडकली आणि नंतर बाल्कनीच्या दिशेने गेली. यादरम्यान ती खिडकीजवळ आली आणि तीने मला वाचवा वाचवा अशी विनंती करित होते.
100% भाजली होती, हॉस्पिटल मधे गेला जीव
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी आठच्या सुमारास बचावकार्य सुरू झाले. अग्निशमन दलाचे पथक आठव्या मजल्यावर पोहोचले. तिथून दोरी बांधून दोन जण त्या बाल्कनीत पोहोचले. त्यांनी मुलीला बाहेर काढले, पण तोपर्यंत ती 100% भाजली होती. तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले.