Advertisement

कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन

प्रजापत्र | Friday, 06/01/2023
बातमी शेअर करा

 साऊथ सिनेविश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर सुनील बाबू यांचं निधन झालं आहे. त्यांची वयाच्या 50व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं सुनील यांचं निधन झालं.   बँगलोर डेज, गजनी सारख्या मोठ्या सिनेमांसाठी त्यांनी काम केलं आहे. थलपती विजयच्या वरिसू सिनेमामुळे ते चर्चेत आले होते. अंजलि मेनन यांनी सुनील बाबूच्या निधनाची माहिती दिली आहे. सुनील बाबूच्या निधनानं साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुनील बाबूला हृदयविकाराचा झटका आला. ते रुग्णालयातच होते. मीडिया रिपोर्टनुसार, तीन दिवसांआधी त्यांच्या पायाला सूज आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

सुनील बाबू यांनी मल्याळम, तेलुगू, तमिळ तसंच हिंदी सिनेमांसाठी आर्ट डिझानयिंग केलं आहे. त्यांनी आर्ट डायरेक्टर साबू सिरिल यांच्या मदतीनं फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. सुनील बाबू यांच्या कामासाठी त्यांना अनेक अवॉर्ड्सनी गौरवण्यात आलं आहे. साऊथ सिनेमांबरोबरच त्यांनी अनेक प्रसिद्ध हिंदी सिनेमांसाठीही काम केलं. 'सिंग इज किंग', 'एमएस धोनी', 'पा', 'लक्ष्य', 'स्पेशल 26' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांसाठी त्यांनी काम केलं आहे. त्याचप्रमाणे सुनील यांनी रोज सारख्या हॉलिवूड सिनेमासाठीही आर्ट डायरेक्शन केलं होतं.

Advertisement

Advertisement