Advertisement

विविध क्षेत्रातील तज्ञ यांचे मार्गदर्शन व संवाद

प्रजापत्र | Thursday, 29/12/2022
बातमी शेअर करा

उस्मानाबाद - शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोरील आर्यन फंक्शन हॉल येथे शनिवार, 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत स्मृतीशेष रंगनाथ कांबळे (मामा) यांच्या 17 व्या स्मृतिदिनानिमित्त एकदिवसीय आंबेडकरी विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन व संवाद साधणार आहेत. संमेलनाचे उदघाटन सकाळी 10 वाजता आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड (नांदेड) यांच्या हस्ते होणार आहे. उदघाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत तथा सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानचे सचिव दत्ता गायकवाड हे असणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ऍड सुदेश माळाळे हे आहेत. दोन सत्रात होणाऱ्या या संमेलनात विविध मान्यवरांचे विचारमंथन होणार आहे. उदघाटन सत्रात वसतिगृहात शिकून नावारूपाला आलेले तीन लाभार्थ्यांचे मनोगत मुख्य आकर्षण असणार आहे. यामध्ये शिक्षणमहर्षी आर. डी.सुळ (भूम) यांचे वसतिगृहातील मामांच्या आठवणीवर विशेष मार्गदर्शन होणार आहे. त्याचबरोबर वसतिगृहातील माजी विद्यार्थी असलेले सेवानिवृत्त लेखाधिकारी तथा दिग्दर्शक, कवी, लेखक रवींद्र शिंदे, शिक्षक राजेंद्र अंगरखे हे विचार व्यक्त करणार आहेत. दुसऱ्या सत्रात यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड (पुणे) यांचे 'तरुणांसमोरील आव्हाने आणि उपाय' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. याच सत्रात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. डी. टी. गायकवाड (पुणे) यांचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान' या विषयावर व्याख्यान होईल. या सत्राचे अध्यक्ष ग्रामीण कथाकार आणि जेष्ठ साहित्यीक योगीराज वाघमारे आहेत. या आंबेडकरी विचार संमेलनास साहित्यप्रेमी नागरिकांनी समाजबांधवानी उपास्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने प्रा. एम.आर.कांबळे आणि ऍड. अजित कांबळे तसेच स्वागताध्यक्ष ऍड. सुदेश माळlळे यांनी केले आहे. कोण होते कांबळे मामा? मागासवर्गीय, ओबीसी ,भटक्या समाजातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून कळंब आणि भूम येथे 1955 ते 2005 या प्रदीर्घ कालावधीत महत्प्रयासाने रंगनाथ कांबळे (मामा) यांनी वसतिगृह चालवले. अपुऱ्या निधीवर एवढे वर्षे वसतिगृह चालवणे अशक्यप्राय गोष्ट. त्यांचे हे सामाजिक योगदान समाजासमोर यावे आणि त्या प्रेरणेने आणखी नवीन मंडळी तयार व्हावी या व्यापक हेतूने हे विचार संमेलन आयोजित केले असल्याचे संयोजकांनी सांगितले.

Advertisement

Advertisement