Advertisement

परळीतील प्रसिद्ध वादक बाबूराव आवचारे यांचे निधन

प्रजापत्र | Monday, 26/12/2022
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) - आपल्या हलगीच्या ठेक्यावर सर्वांना ठेका धरायला लावणारी हलगी अबोल झाली आहे. मराठवाड्यात आपल्या हलगीवादनाने व बॅण्डने प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध वादक परळी भुषण बाबू आवचारे यांचे  आज (दि.26)  सायंकाळी निधन झाले.
   आपल्या हलगीच्या ठेक्यावर सर्वांना ठेका धरायला लावणारी हलगी वादन बाबू आवचारे करत. त्यावर अनेकांच्या लेझमीने ठेका धरला. प्रसिध्द हालगीवादक बाबू आवचारे म्हणजे परळीतील कुठलाही  कार्यक्रम असो, त्यांचे हालगीवादन ठरलेले. परळीचे  भुषण व  गजा ढोलपथकाचे व्यवस्थापक मालक बाबुराव अवचारे अतिशय सुस्वभावी, संयमी व सर्वपरिचित व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते.परळीभुषण, सुप्रसिद्ध वादक बाबुराव अवचारे यांना  हृदयविकाराचा त्रास झाला.परळीतील एका  हाॅस्पीटल येथे उपचारादरम्यान सायं. 7:00 वा दुःखद निधन झाले. मृत्युसमयी  ते 75 वर्षे वयाचे होते.त्यांच्या पश्चात 6 मुलं एक मुलगी जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

 

 

उद्या दिनांक.27 रोजी अंत्यविधी....
दरम्यान उद्या दिनांक.27 रोजी सकाळी 10 वा.शांंतीवन स्मशानभूमी परळी वैजनाथ येथे अंत्यविधी होणार आहेत.  

Advertisement

Advertisement