Advertisement

१५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

प्रजापत्र | Saturday, 24/12/2022
बातमी शेअर करा

मुंबईत एका १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोअर परळमध्ये ही घटना घडली आहे. शुक्रवारी मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक म्हणजे सहा आरोपींमधील तिघे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ तारखेला लोअर पऱळमध्ये १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपींमधील एक अल्पवयीन तरुण पीडितेचा मित्र आहे. पीडितेला घेऊन तो आपल्या मित्राच्या घरी गेला होता. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्का करण्यात आला.

तरुणीने कुटुंबीयांना सगळी घटना सांगितल्यानंतर त्यांनी एन एम जोशी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. यातील तिघे अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर इतर तिघांना अटक करुन न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून पुरावे गोळा करत आहेत.

Advertisement

Advertisement