Advertisement

एकनाथ शिंदेंना राजीनामा द्यावाच लागणार

प्रजापत्र | Thursday, 22/12/2022
बातमी शेअर करा

नागपुरातील एनआयटी प्रकरण हे आम्ही नव्हे तर भाजपच्याच आमदारांनी काढले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह अन्य दोन आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याचाच आम्ही पाठपुरावा करीत आहोत. बावनकुळेंनी ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यंमंत्री व्हावे ही इच्छा व्यक्त केली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी हे प्रकरण काढले. भाजप आमदारांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको असून त्यांचा वरवर सपोर्ट आहे असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत केला.

 

 

शेवाळे प्रकरण रंगवत आहेत
संजय राऊत म्हणाले, राहुल शेवाळे यांनी काहीही कारण नसताना एक विषय उपस्थित केला. चर्चा 193 खाली एका वेगळ्या बिलावर होती. वाढलेल्या अमली पदार्थाचा व्यापारावर चर्चा असतानाही ते आदित्य ठाकरेंवर कारण नसताना घसरले. त्यानंतर ज्या पद्धतीने रंगवण्यात आला. काही चौकश्यांची मागणी झाली.

 

 

राहुल शेवाळेंना बोलण्याचा अधिकार नाही
संजय राऊत म्हणाले, प्रश्न एवढाच आहे की, राहुल शेवाळेंना बोलण्याचा अधिकार आहे का? राहुल शेवाळे कालपर्यंत शिवसेनेतच होते. मुळात सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली. पण कारण नसताना शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांसह बिहार पोलिस व त्यानंतर सीबीआयकडे तपास गेला.

 

 

एनआयडी घोटाळ्यामुळेच आरोप
संजय राऊत म्हणाले, सध्या भाजपचे सरकार असतानाही सीबीआयकडून तपास झाल्यानंतर सुशांतसिंहची आत्महत्याच असल्याचे निष्पन्न झाले. परंतु तरीही हे प्रकरण उकरुन आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. त्याचा संबंध फक्त मुख्यमंत्र्यांच्या एनआयडी घोटाळा आम्ही काढला त्यामुळेच आहे.

 

 

कवडीमोल भावात भुखंड विकला
संजय राऊत म्हणाले, आताच्या मुख्यमंत्र्यांनी कोट्यावधींचा भुखंड रेवड्या वाटाव्या अशा कवडीमोल भावात दिला. हे प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अंगलट येत आहे. त्यामुळे त्यांच्या गटाकडून आदित्य ठाकरेंवर बदनामीचे शिंतोडे मारण्याचे काम केले जात आहे. भुखंड घोटाळा एवढा साधा आणि सोपा नाही. गरीबांसाठी राखीव भुखंड ज्या पद्धतीने शंभर कोटींचा व्यवहार करुन मर्जीतील लोकांना दिले गेले. हे प्रश्नचिन्ह आम्ही उभे केले नाही तर दीड महिन्यापूर्वी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रविण दटके, नागोराव गाणार यांनी तारांकित प्रश्न विचारून या प्रकरणावर चौकशी करा असे म्हटले हेच प्रकरण आम्ही घेतले आहे.

 

एनआयटी घोटाळा गंभीरच
संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या भ्रष्ट्राचाराचे प्रकरण देवेंद्र फडणवीसांच्याच पक्षातील आमदारांना वाटते. हे प्रकरण समोर आणण्यात भाजपच्याच लोकांचा हात आहे. ते कोण आहेत हे मी सांगणार नाही. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीच जर सांगितले असेल तर तेच नंतर नागपुराच्या कार्यक्रमात सांगतात की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिंदेंचे प्रकरण काढले जाते याचा अर्थ शिंदे गटाने समजून घ्यावा.

 

शिंदेंना राजीनामा द्यावा लागणार
संजय राऊत म्हणाले, शिवसेनेवर आरोप करण्यापेक्षा तुमच्या घरात काय सुरु आहे ते बघा. वर वर भाजप आमदार एकनाथ शिंदेंची बाजू घेत आहेत परंतु दिल्लीत वेगळ्याच गोष्टी घडत आहेत म्हणून शिंदेचे सरकार फेब्रुवारीपर्यंत टीकणार नाही. एकनाथ शिंदेंना राजीनामा द्यावा लागणार आहे. विशेषतः नरेंद्र मोदी हे जर भ्रष्ट्राचारविरोधी असतील तर ते शिंदेंवर आरोप असताना सरकार चालू देणार नाहीत. अमित शहा भ्रष्ट्राचाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असे सांगतात.
 

Advertisement

Advertisement