Advertisement

पावडरचं उत्पादन सुरू ठेवण्यास परवानगी

प्रजापत्र | Friday, 16/12/2022
बातमी शेअर करा

जॉन्सन अँड जॉन्सनला हायकोर्टानं पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. कंपनीचा बेबी पावडर बनवण्याचा परवाना संपलेला असतानाही हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं हायकोर्टानं पुढील निर्देश येईपर्यंत त्यांना पावडरचं उत्पादन सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र हे उत्पादन करताना एफडीनं लावलेली विक्री आणि वितरणावरील बंदी 3 जानेवारीपर्यंत कायम राहील असं हायकोर्टानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. 

 

 

परवाना रद्द करण्याचा निर्णय योग्यच, राज्य सरकारचा हायकोर्टात दावा
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा बेबी पावडरसाठीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय योग्यच असून नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचा दावा राज्य सरकारनं हायकोर्टात केला आहे. औषध आणि सौंदर्य प्रसाधनं कायदा आणि लोकांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी असलेल्या नियमांची अंमलबजावणी न केल्यास आपल्या कर्तव्याचं पालन करण्यात सरकार अपयशी ठरेल, असा दावाही सरकारनं हायकोर्टात केला आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित  उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा करणं ही याचिकाकर्त्या कंपनीची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे बेबी पावडरच्या गुणवत्तेची खात्री न देता त्याचा अंतिम वापर होईपर्यंत नियमांनुसार उत्पादन विक्री करता येणार नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारनं हायकोर्टात मांडली आहे.

 

Advertisement

Advertisement