Advertisement

बिपिन बाफना खून प्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा

प्रजापत्र | Friday, 16/12/2022
बातमी शेअर करा

नाशिक : बिपिन बाफना खून प्रकरणी दोघा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. चेतन पगारे आणि अमन जट अशी फाशीची शिक्षा सुनावलेल्या दोघांची नावे आहेत. नाशिक जिल्ह्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहेत. या प्रकरणात पाच पैकी तीन आरोपींची मंगळवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली तर दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. 
2013 मध्ये बिपिन बाफना या तरुणाचे खंडणीसाठी अपहरण करून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. हत्येनंतर साडेनऊ वर्षानंतर आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी वकील अजय मिसर यांनी बाफना खून खटल्याचे सरकारतर्फे कामकाज पाहिले. 

 

 

काय आहे प्रकरणय
नाशिकमध्ये 2013 मध्ये एक कोटीच्या खंडणीसाठी बिपिन बाफना या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर बिपिन याची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर पाच आरोपंवर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.  जवळपास साडेनऊ वर्षे या प्रकरणी न्यायालयीन लढा सुरू होता.  मंगळवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन या गुन्ह्यातील दोघांना दोषी ठरविण्यात आले. तर तिघा संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यांनतर दोषींना आज शिक्षा सुनावण्यात आली.   8 जून 2013 रोजी मयत विपीन गुलाबचंद बाफणा हा डान्स क्लासला जाऊन येतो असे सांगून गेल्यानंतर त्याचे अपहरण करीत अज्ञात व्यक्तीने विपिनच्या मोबाईलवरून गुलाबचंद बाफना यांना फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली होती.

 

 

गुन्हा दाखल झाल्याने हत्या
अपहरणानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने संशयितांनी विपीन बाफना याची निर्घृण हत्या केली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून या हत्याकांडातील संशयित अमन जट, चेतन यशवंतराव पगारे, अक्षय उर्फ बाल्या सुरज सुळे, संजय रणधीर पवार, पम्मी भगवान चौधरी यांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अपहरण करून हत्या करण्याबाबत दाखल असलेला खटला न्यायालयात साडेनऊ वर्ष चालला आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, साक्षीदार आणि पंचांचे जबाब नोंदविण्यात आले आहे.  

 

Advertisement

Advertisement