जोधपूरमध्ये एका लग्न सोहळ्यात 5 गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने मोठा गोंधळ उडाला. या अपघातात नवरदेवासह आई-वडिल व जवळपास 60 लोक भाजले गेले. यात दोन मुलांचा मृत्यू झाला.
शेरगडजवळील भुंगरा गावात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. येथील तख्तसिंह यांच्या घरी विवाह सोहळा होता. लग्नाची मिरवणूक घरातून निघणार होती, तेवढ्यातच अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता रुग्णालयात पोहोचले. डॉ. एस. एन मेडिकल कॉलेजचे प्राचार्य दिलीप कछवा यांनी सांगितले की, 60 जखमींपैकी 51 जणांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 8 जण 90 टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. वॉर्डमध्ये 48 जण दाखल आहेत. 1 मुलगा आयसीयूमध्ये आहे. तर 5 आणि 7 वर्षांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे मोठ्या संख्येने वऱ्हाडी उपस्थित होते. जळालेल्या लोकांना शेरगड येथे आणण्यात आले. येथील काही लोकांना जोधपूर येथील महात्मा गांधी रुग्णालयाच्या बर्न युनिटमध्ये रेफर करण्यात आले आहे.