उस्मानाबाद : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा सध्या उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आहे. आज सुषमा अंधारे यांची उस्मानाबाद व परंडा येथे जाहीर सभा आहे. परंतु या सभे पूर्वी च जिल्ह्यातील ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आज पुणे येथे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.जिल्ह्यातील ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी आज दुपारीच बारा वाजता विविध वाहनांनी पुण्याला रवाना झाले आहेत. शिंदे गटात कोण कोण प्रवेश करीत आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे
बातमी शेअर करा