तेलंगणाच्या वरंलगमध्ये चॉकलेट खाल्ल्यामुळे एका 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उजेडात आली आहे. ही घटना कंघन सिंह यांच्यासोबत घडली. त्यांनी आपल्या मुलासाठी परदेशातून चॉकलेट आणली होती. 8 वर्षीय संदीपने ती खाल्ली. पण ती त्याच्या गळ्यातच अडकली. त्याला घाईगडबडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, इयत्ता दुसऱ्या वर्गात शिकणारा संदीप वडिलांनी आणलेल्या काही चॉकलेट्स शनिवारी शाळेत घेऊन गेला होता. चॉकलेट खाल्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास झाला.
ऑस्ट्रेलियाहून आणले होते चॉकलेट्स
कंघन सिंह वरंगलमध्ये इलेक्ट्रिक शॉप चालवतात. ते 50 वर्षांपूर्वी राजस्थानातून येथे आले होते. त्यांना 4 मुले आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ट्रिपवर गेलेल्या कंगन सिंह यांनी मुलांसाठी तेथील चॉकलेट्स आणल्या होत्या. संदीप त्यातील काही चॉकलेट घेऊन शाळेत गेला होता. त्या खाल्ल्यानंतर त्याला दम लागला. शिक्षकाने शालेय प्रशासनाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली. त्याला रुग्णालयात घेऊन गेले. पण श्वसनास त्रास झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
4 महिन्यांपूर्वी बंगळुरूतही घडली होती अशी घटना
कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातही एका 6 वर्षीय मुलीच्या गळ्यात चॉकलेट अडकल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. सामन्वी पुजारी आपल्या घराबाहेर उभ्या असणाऱ्या स्कूल बसमध्ये चढताना ही घटना घडली. सामन्वी शाळेत जाण्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे तिची आई सुप्रिता पुजारीने तिची समजूत काढण्यासाठी तिला चॉकलेट दिली.