Advertisement

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

प्रजापत्र | Friday, 25/11/2022
बातमी शेअर करा

 ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून पुढील 48 तासांत व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो. विक्रम गोखले आता हळूहळू डोळ्यांची हालचाल करत असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरिश याडगीकर यांनी दिली आहे.

 

 

रुग्णालयाने जारी केले हेल्थ बुलेटिन
77 वर्षीय विक्रम गोखले मागील 15 दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत. बुधवारी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. आता रुग्णालयाने त्यांचे हेल्थ बुलेटिन जारी केले आहे. विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असून त्यांनी डोळे उघडले आहेत. पुढील 48 तासांत त्यांचा व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो. तसेच बीपी आणि हृदयाची क्रिया सुरळीत सुरू आहे, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
 

Advertisement

Advertisement