Advertisement

राहुल गांधींच्या सभेत अज्ञाताने फोडले फटाके

प्रजापत्र | Saturday, 19/11/2022
बातमी शेअर करा

बुलढाणा-काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांची बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील भास्तान या गावी कॉर्नर सभा सुरू असताना आज रात्री ७.१५ च्या सुमारास अज्ञाताने फटाके फोडले आहेत. राहुल गांधी यांचे भाषण सुरू असतानाच फटाके फोडल्याने राहुल गांधी यांनी आपले भाषण अर्धवट सोडले. राहुल गांधी यांनी फटाके वाजवणाराचा निषेध केला आहे.  
काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. यात्रा आज बुलढाण्यात असताना राहुल गांधी यांची खामगाव तालुक्यातील भास्तान या गावी कॉर्नर सभा सुरू होती. यावेळी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना कार्यकर्त्यांनी स्टेज जवळच मोठ्या आवाजात फटाके फोडले. त्यामुळे राहुल गांधी यांनी सभेत भाषण अर्धवट सोडले. राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यास सांगितले आणि फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. यावेळी कोणीतरी ज्याने ही हरकत केली त्याला ताब्यात घ्यावे असे माईकवरून सांगितले. 
दरम्यान, सभेत फटाके फोडण्यावरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीक केली आहे. "राहुल गांधी यांनी बोलावलेल्या कॉर्नर सभेत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करताना फटाके फोडून आनंद साजरा केला आणि आपली शेतकऱ्यांप्रति असंवेदनशीलता दाखविली. शतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करताना फटाके फोडतात का...?  आपल्याच मंचावर अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराला बसवून शेतकऱ्यांना राहुल गांधी यांनी अपमान केलाय, अशी टीका  खामगाव विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार आकाश फुंडकर यांनी केलीय.  

 

Advertisement

Advertisement