तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला. कल्याणी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत तिने अभिनयाचा ठसा उमटवला होता. तिच्या मृत्यूनंतर मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी कुरळे हिने काही दिवसांपूर्वी कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा या ठिकाणी एक हॉटेल सुरु केले होते. प्रेमाची भाकरी असे या हॉटेलचे नाव होते. हे हॉटेल बंद करुन बाहेर पडत असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तिला धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला.
बातमी शेअर करा