Advertisement

मालिकांची संपत्ती जप्त करण्यास परवानगी

प्रजापत्र | Saturday, 05/11/2022
बातमी शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिकांना ईडीने जोरदार धक्का दिला असून, मलिकांची संपत्ती जप्त करण्यास परवानगी दिलीय. विशेष म्हणजे मलिकांच्या नातेवाईकांची संपत्तीही जप्त करण्यात येणारय. त्यासाठी कायदेशीर सल्लामसलत सुरू असल्याचे समजते.सध्या मनी लाँड्रिंगप्रकरणी नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय.

 

मलिक रुग्णालयात
नवाब मलिक यांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसना पारकरशी आर्थिक व्यवहार केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. यामुळेच ते सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

नेमके प्रकरण काय?
ईडीच्या म्हणण्यानुसार नवाब मलिक, मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी रसदार खान, दाऊदची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर यांची तीन एकर जमीन बळकावली. मुनीरा यांनी 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली. पटेलने याचा गैरफायदा घेतला. हसीना पारकरच्या म्हणण्यावरून गोवावाला कंपाउंडमधील जागा मलिकांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकली. त्यानंतर मलिकांनी ही जागा भाड्यावर दिली. त्यातून आलेल्या पैशांमधून संपत्ती कमावली, असा आरोप आहे.

 

 

कुठे घेतली मालमत्ता?
ईडीने मलिकांची संपत्ती जप्त करण्याची परवानगी दिली. त्यानुसार गोवावाला कंपाउंडमधील जागाच्या भाड्यातून आलेल्या पैशातून मलिकांनी वांद्रे, कुर्ला येथे फ्लॅट घेतल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी उस्मानाबाद येथे शेतजमीन खरेदी केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. आता मलिकांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे.

 

 

कुठे येणार जप्ती?
- मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील जमीन.
- कुर्ला पश्चिम येथील तीन फ्लॅट.
- वांद्रे पश्चिम येथील दोन फ्लॅट.
- उस्मानाबाद जिल्ह्यातील 147 एकर शेती.

 

Advertisement

Advertisement