Advertisement

शिक्षकेत्तर संघटनेची कार्यकारिणी जाहीर

प्रजापत्र | Thursday, 03/11/2022
बातमी शेअर करा

खेड-आज गुरूवार दि. 3/11/2022 रोजी खेड तालुका शिक्षकेतर संघटनेची कार्यकारिणीची निवड झाली. त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह आदरणीय सर्वांचे प्रेरणास्थान शिक्षकेतर संघटनेचा बुलंद आवाज शिवाजीराव खांडेकर सर यांच्या उपस्थितीत व पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे उपाध्यक्ष श्री. संदिप कोल्हे तसेच कोषाध्यक्ष श्री. सुभाष तांबे सर यांच्या उपस्थितीत खेड तालुक्याची कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडण्यात आले यामधून संघटनेची एकी व तालुक्याचे संघटन दिसून आले. कार्यकारणीसाठी आठ सदस्यांची निवड करण्यात आली.त्यामध्ये अध्यक्ष म्हणून मार्गदर्शक श्री. विजय पवार सर बा .मा पवार माध्यमिक विद्यालय बिरदवडी सचिव श्री अरविंद भारमळ महात्मा गांधी विद्यालय खेड , सह सचिव श्री. संजय ऐवले सर कर्मवीर विद्यालय वाडा उपाध्यक्षपदी चंद्रकांत बोराडे भैरवनाथ विद्यालय दोंदे श्री राहुल आरूडे सदस्य त्रिमूर्ती विद्यालय तिन्हेवाडी सौ संगिता पाटील जि.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी श्री विलास नितनवरे सदस्य शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद श्री मुंडें सर हुतात्मा विद्यालय राजगुरुनगर सगळे पदाधिकारी अनुभवाने मोठे आहेत संघटनेसाठी मोलाचे योगदान देतील अशा प्रकारचे शब्द उच्चार श्री. खांडेकर सरांनी केले प्रसंगी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संघटना बलवान करायचे असेल तर संघटनेसाठी वेळ देणे गरजेचे आहे. शासनाचा भविष्य काळातील दृष्टिकोन समोर ठेवून संघटना बलवान होणे गरजेचे आहे तसेच शिक्षकेतर संघटना कर्मचाऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी व शिक्षकेतरांना न्याय देण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. श्री. खांडेकर सरांनी शासनाचे विविध ध्येय धोरणे व विविध प्रलंबित प्रश्नांबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच श्री. संदीप कोल्हे सर यांनीही शिक्षकेतर संघटने बाबत आपले अधिकार व कर्तव्य याबाबतचे मार्गदर्शन केले. तसेच महात्मा गांधी विद्यालय च्या उपप्राचार्या कांबळे मॅडम यांनी ही मार्गदर्शन केलेतसेच सौ संगिता पाटील मॅडम यांनी खुप मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच श्री. शिवाजी खांडेकर सर यांनी सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.सुत्रसंचलन श्री विजय पवार सर यांनी केले व श्री भारमळ सर व भगत सर यांनी आभार मानले या सर्वांचे तालुक्यातील मुख्याध्यापक विविध विषय संघटना अध्यक्ष पदाधिकारी व सर्वांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे अशी माहिती बा. मा. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिरदवडी चाकण ता. खेड जि. पुणे चे श्री दादासाहेब ढाकणे सर यांनी दिली

Advertisement

Advertisement