Advertisement

एमपीएसीकडून 623 पदांवर होणार भरती

प्रजापत्र | Monday, 31/10/2022
बातमी शेअर करा

मुंबई : महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (MPSC) परीक्षा 2022 साठी 623 पदे भरली जाणार आहेत. एमपीएससीकडून या पूर्वी 161 पदे भरली जाणार होती. त्यामध्ये 432 पदांची वाढ करून आता 623 पदे भरण्यात येणार आहेत. एमपीएसीकडून नुकतीच याबाबत माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 डिसेंबर मध्ये होणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये मुख्य परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जागा वाढल्याने याचा फायदा होणार आहे.

 
महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा 2022 ही 161 पदांसाठी या आधी घेण्यात येणार होती. परंतु, आता यामध्ये 432 पदे वाढवण्यात आली आहेत. त्यामळे आता एकूण 623 पदांची भरती या परीक्षेतून होणार आहे. या पदांचा तपशील एमपीएससीने त्यांच्या अधिकृक  संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा 2022 मार्फत 623 पदे भरली जाणार आहेत. राज्यसेवा परीक्षा 2022 साठी 11 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर या परीक्षेसाठी काही नवीन संवर्गातील 432 पदांचे अतिरिक्त मागणी पत्र शासनाकडून प्राप्त झाले होते. त्यानुसार ही पदे भरली जाणार आहेत. राज्यसेवा परीक्षा 2022  साठी 161 पदे तसेच अतिरिक्त 462 मध्ये विचारात घेऊन 623 पदांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.  

 

 

गट अ आणि गट ब संवर्गातील 623 पदे भरणार
एमपीएसीकडून उपजिल्हाधिकारी, पोलिस उपाधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त, साहाय्यक राज्यकर आयुक्त, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, तहसीलदार अशाप्रकारची गट अ आणि गट ब संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गासाठी वयोमर्यादा 1 एप्रिल 2023 रोजी गणण्यात येईल. तर इतर सर्व पदांसाढी वयोमर्यादा जाहिरातीमध्ये नमूद 1 सप्टेंबर 2022 गणण्यात येईल. 

 

Advertisement

Advertisement