Advertisement

ग्रामसभा घेऊन करा आयुष्मान भारत कार्डांचे वाटप

प्रजापत्र | Monday, 31/10/2022
बातमी शेअर करा

बीड दि. ३१ (प्रतिनिधी ) : राज्यात पंतप्रधान जन  आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे आयुष्मान भारत कार्ड असणे आवश्यक आहे. मात्र राज्यात या कार्डांचे  वितरण अजूनही पुरेशा प्रमाणात झालेले नाही. त्यामुळे आता गावागावात ग्रामसभा घेऊन आयुष्मान भारत कार्डांचे लाभार्थ्यांना वाटप करावे निर्देश राज्य आरोग्य हमी सोसायटीचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड आवश्यक आहे. त्याची नोंदणी या योजनेच्या समन्वयकमार्फत केली जाते. मात्र आजघडीला या कार्डांचे विचारांचे प्रमाण अत्यल्प आहे. राज्यात या योजनेचे सुमारे अडीच कोटी लाभार्थी अपेक्षित असले तरी आतापर्यंत केवळ ७७ लाख लाभार्थ्यांनाच हे कार्ड देण्यात आले आहेत. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पदभार घेतल्यानंतर आता या विषयाला हात घातला आहे.

 

त्यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या कार्डचे वाटप करण्यासाठी विशेष ग्रामसभा आणि शिबिरे घेण्याचे निर्देश दिले आहेत. आयुष्मान भारत योजनेचे समन्वयक आणि गट विकास अधिकारी यांच्यसह गावपातळीवर ग्रामसेवकांची मदत घेऊन कार्ड वाटप करावे असेही टाकसाळे यांनी आपल्या निर्देशांमध्ये म्हटले आहे. 
 

Advertisement

Advertisement