दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये शनिवारी रात्री उशिरा हॅलोविन उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 151 जणांचा मृत्यू झाला असून दीडशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांना हृदयविकाराचा झटका आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्सवादरम्यान लाखो लोक अरुंद रस्त्यावर आले होते, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली होती. गर्दीत चिरडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर देशात राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.
50 जणांना सीपीआर देण्यात आला
नॅशनल फायर एजन्सीचे अधिकारी चोई चेओन-सिक यांनी सांगितले की, इटावान लेसर जिल्ह्यातील एका अरुंद रस्त्यावर गर्दी जमल्याने ही घटना घडली. मृतांचा आकडा वाढू शकतो. काहींना हृदयविकाराचा झटका आला.आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे 81 जणांना श्वास घेण्यास त्रास होत होता. या सर्व लोकांना सीपीआर देण्यात आला. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी अधिकाऱ्यांना जखमींना चांगले उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच त्यांना उत्सवाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.