महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर जात असतानाच आता नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द होण्याच्या टप्प्यावर आहे, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. नाशिकमधील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरूवात झाली. तेव्हा ते बोलत होते.
मंजुऱ्यांसाठी ५ वर्षे
भुजबळ यांनी सांगितले की, सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर गेल्या ६ महिन्यांपासून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. आता रेल्वे मंत्रालयाला अचानक हा प्रकल्प योग्य नसल्याचा साक्षात्कार झाला. वेगवेगळ्या मंजुऱ्यांसाठी ५ वर्षांचा कालावधी गेला. एवढे दिवस रेल्वे मंत्रालय झोपले होते का? असा संतप्त सवालही भुजबळ यांनी केला.
केवळ अंतिम मंजुरीची प्रतीक्षा
भुजबळ म्हणाले की, नाशिक-पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने २० टक्के वाटा उचलण्यास मंजुरी दिली होती. या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून महारेल या कंपनीची निर्मिती करण्यात आली. हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर गेल्या ६ महिन्यांपासून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. आता रेल्वे मंत्रालयाला अचानक हा प्रकल्प योग्य नसल्याचा साक्षात्कार झाला. त्यांना वेगवेगळ्या मंजुऱ्यांसाठी ५ वर्षांचा कालावधी गेला. एवढे दिवस रेल्वे मंत्रालय झोपले होते का?