परळी दि.२१(प्रतनिधी)- नदीला आलेल्या पुरात २५ वर्षीय युवक वाहून गेला होता.अथक परिश्रमानंतर अखेर त्या युवकाचा मृतदेह सापडला.दि(२०) रोजी हा युवक वाहून गेला होता.आज त्याचा मृतदेह सापडला.ही घटना परळी तालुक्यातील पिपळगाव येथे घडली.
तालुक्यात (दि 20) रोजी रात्रीच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह अनेक तास धुंवादार पाऊस झाल्याने शहर व तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले.परळी तालुक्यातील गाढे पीपळगाव येथील अक्षय विक्रम आरगडे हा 25 वर्षीय युवक नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. परळी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवीत शोध कार्य सुरू केले.वाहून गेलेल्या अक्षय आरगडे याचा मृत देह आढळून आला आहे.सध्या अनेक ठिकाणी नदी,ओढे याला पूर आला असून यातुन कोणीही प्रवास करण्याचे धाडस करू नये असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.