Advertisement

रायमोह परिसरात ढगफुटी

प्रजापत्र | Thursday, 20/10/2022
बातमी शेअर करा

शिरूर – तालुक्यातील रायमोह शिवारात ढगफुटी सदृश पाऊस झाला.यामुळे नदीला आलेल्या महापुरात बुडल्याने तिघांचा मृत्यू झाला.यामध्ये दोन बहीण भावाचा समावेश आहे.घटनास्थळी तहसील आणि पोलीस दाखल झाले आहेत.

 

स्वरा कुंडलिक सोनसऴे,छकुली कुंडलिक सोनसऴे , साईनाथ भोसले हे सर्व रा.भानकवाडी ता.शिरुर (का) जि.बीड अशी मृतांची नावे आहेत.

 

रायमोह मंडळात ढगफुटी झाल्याने नदीला आलेल्या महापूरात कुंडलिक सोनसळे यांचा मुलगा आणि मुलगी हे दोघेही वाहून गेले.तसेच साईनाथ भोसले हे देखील पुराच्या पाण्यात वाहून गेले.

 

या घटनेची माहिती मिळताच एनडी आर एफ ची तुकडी घटनास्थळी दाखल झाली.पुरात वाहून गेलेल्या मृतदेहांचा दोन तास शोध सुरू होता.घटनास्थळी तहसीलदार आणि पोलीस दाखल झाले आहेत.

Advertisement

Advertisement