Advertisement

"लक्षात ठेवा माझे सासरे शिंदे होते"

प्रजापत्र | Thursday, 20/10/2022
बातमी शेअर करा

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी एमसीएची बैठक तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिग्गज प्रथमच एका मंचावर एकत्र आले. यावेळी या तिन्ही नेत्यांची अराजकीय जुगलबंदी व मिश्किल टोलेबाजीमुळे या कार्यक्रमाची तुफान चर्चा रंगली आहे.

 

 

पवारांचा CM शिंदेंना सूचक इशारा
एमसीए निवडणुकीचा धागा पकडत मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून शरद पवार म्हणाले,
माझे सासरे शिंदे होते. फक्त शिंदे नव्हते क्रिकेटर शिंदे होते. महत्त्वाचे म्हणजे शिंदेंची मुलगी पवारांची बायको आहे. त्यामुळे शिंदेंनी आपल्या मुलीची नीट काळजी घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्यांचा गांभीर्यानं विचार करावा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो.
शरद पवारांच्या या मिश्किल विधानामुळे सभागृहात हास्याचा स्फोट तसेच टाळ्यांचाही कडकडाट झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांच्या या मिश्लिक विधानाला दाद दिली. त्यानंतर भाषणास उभे राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांच्या या सूचक इशाऱ्याला हजरजबाबीपणे उत्तर दिले.

 

 

फडणवीसांचे प्रत्युत्तर
फडणवीस म्हणाले, आता पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांवर जी काही जबाबदारी टाकली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांना असं बांधलं आहे की आता सासरच्या माणसांना कोण टाळू शकतं?

फडणवीस यांच्या उत्तरालाही सर्वांनीच दाद दिली.
 

Advertisement

Advertisement