Advertisement

तब्बल 16 उद्योजकांना डावलून रितेश-जिनिलियाच्या कंपनीला 10 दिवसात लातूर एमआयडीसीत भूखंड

प्रजापत्र | Wednesday, 19/10/2022
बातमी शेअर करा

लातूर: अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख  यांच्या कंपनीसाठी अवघ्या 10 दिवसात लातूर एमआयडीसीत  भूखंड मंजूर करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला महिन्याभरातच 120 कोटी रुपयांचे कर्जही मंजूर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे लातूर एमआयडीसी भागात 2019 पासून भूखंडासाठी 16 उद्योजकाची प्रतीक्षा यादी असताना त्यांना का डावलण्यात आलं असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यावर लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित आरोप केले आहेत.

 

 

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोणत्या निकषावर 120 कोटींच्या कर्जाचा पुरवठा केला, आणि त्यामध्ये एवढी तत्परता कशी दाखवली असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. या कंपनीवर आता लातूर बँकेने आक्षेप घेतले आहेत. या बाबत पत्रकार परिषद घेत भाजपाने याचा सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे. 

 

 

देशमुखांच्या देश अग्रो प्रा लिमिटेड या कंपनीसाठी यंत्रणा गतीने कामाला लागल्याचं दिसून येतंय. अवघ्या काही दिवसात एमआयडीसी भागात या कंपनीला प्लॉट देण्यात आला आहे. त्यासाठी कोट्यवधीचं कर्जही  बँकेने उपलब्ध करण्यात आलं आहे. 

Advertisement

Advertisement