मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. फेसबुक लाईव्ह करत त्यांनी विष प्राशन केले आहे. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात एक ऑडिओ क्लीपही व्हायरल होत होती. दरम्यान, माझ्यावरील आरोप खोटे असून या ऑडिओ क्लीपची चौकशी करावी, अशी मागणी करत त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बातमी शेअर करा