राज्य सरकारनं एसटी महामंडळाला (ST Mahamandal) तातडीची मदत जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारनं 300 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला पगारासाठी 360 कोटी रुपयांच्या निधीची गरज असते. पण सरकारनं 300 कोटी रुपयांचीच मदत जाहीर केली आहे. त्यामुळं या मदतीवरुन महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे (Shrirang Barge) यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. जेवढी मागणी केली तेवढा निधी सरकारनं द्यावा, अन्यथा सरकारविरोधात पुन्हा संघर्ष उभा करावा लागले असा इशारा बरगे यांनी दिली आहे.
बातमी शेअर करा