Advertisement

वाल्मिक अण्णा कराड यांना पितृशोक

प्रजापत्र | Wednesday, 12/10/2022
बातमी शेअर करा

परळी (दि.12) माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय, परळी नगर परिषदेचे माजी गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांना पितृशोक झाला असून, त्यांचे वडील कै.बाबुराव राजाराम कराड यांचे आज दुपारी 03 च्या दरम्यान वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 80 वर्षे इतके होते.

 

उद्या सकाळी (दि.13) 09 वाजता कै.बाबुराव कराड यांच्या पार्थिवावर पांगरी (गोपीनाथगड), ता.परळी येथे विधीवत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

कै.बाबुराव कराड हे गेल्या काही दिवसांपासून हृदयाच्या आजाराने त्रस्त होते, दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुणे येथील एका नामांकित रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, उपचारादरम्यान वृध्दापकाळाने त्यांची आज दुपारी प्राणज्योत मालवली. कै.बाबुराव कराड यांच्या मागे पत्नी, वाल्मिकअण्णा कराड, महादेव कराड हे दोन मुले,मुलगी तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.  

वाल्मिकअण्णा कराड यांच्यासह कराड कुटूंबियांचे पितृछत्र हरवल्याने कराड कुटूंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Advertisement

Advertisement