Advertisement

ठाकरे गट आणि शिंदे गटाला मिळालं 'हे' नाव

प्रजापत्र | Monday, 10/10/2022
बातमी शेअर करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व शिंदे गटाने निवडणूक चिन्ह म्हणून मागणी केलेले त्रिशूळ व गदा ही दोन्ही चिन्हे बाद ठरवली आहेत. यासाठी आयोगाने ही चिन्हे धार्मिक प्रतिके असल्याचा दाखला दिला आहे. तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर शिंदे गटाला बाळासाहेब शिवसेना हे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळाले आहे.

 

 

निवडणूक आयोगाने 'धनुष्यबाण' गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संभाव्य निवडणूक चिन्हांची व पक्षाच्या नावाचीही माहिती दिली होती.

 

 

ती चिन्हे धार्मिक प्रतिके
ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हे दिली होती. यात एक त्रिशूळ, दुसरा उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल व पक्षासाठी नावेही निवडणुूक आयोगाला दिली होती. परंतु त्यातील त्रिशूळ हे चिन्ह आयोगाने रद्दबातल ठरवले. तर शिंदे गटाचेही गदा हे चिन्ह रद्दबातल ठरवले आहे. दोन्ही चिन्हे धार्मिक असल्याचेही निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

 

 

ठाकरे गटाला धगधगती मशाल
ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हे तीन चिन्ह पर्याय म्हणून दिले होते. त्यानंतर आयोगाने त्यांना धगधगती मशाल हे चिन्ह दिले आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement