Advertisement

लातूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

प्रजापत्र | Monday, 10/10/2022
बातमी शेअर करा

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात रविवारी दिवसभरात दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी दिली.

 

रविवारी पहाटे एक वाजून २७ मिनिटाला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला त्याची तीव्रता २.१ रिश्टर स्केल इतकी होती तर रात्री नऊ वाजून ५७ मिनिटांनी बसलेल्या भूकंपाची तीव्रता १.९ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात आहे त्या परिसरातील सुमारे दहा एक गावांमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले.

 

मागील महिन्यात भूकंपाचे धक्के हासोरी परिसरात जाणवले याही वेळी ते जाणवत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ ची आठवण नागरिकांच्या मनामध्ये अजूनही दाटलेली आहे. भूकंपाचा धक्का मागच्या महिन्यात दोन वेळा व पुन्हा ऑक्टोबर महिन्यात धक्का जाणवत असल्याने या धक्क्यामागे काय दडले? यातून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

Advertisement

Advertisement