भारताची जागतिक ज्युनियर चॅम्पियन हर्षदा गरुड (Harshada Garud) हिला आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. तिनं 45 किलो वजनी गटात एकूण 152 किलो ग्राम वजन उचललं. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतानं जिंकलेलं हे पहिलं पदक आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून तिच्या कामगिरीचं कौतूक केलं जातंय.
शियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या 68 वजनी गटात हर्षदानं स्नॅचमध्ये 68 किलोग्राम वजन उचललं. त्यानंतर क्लीनं अँड जर्कमध्ये 84 किलोग्राम वजन उचललं. हर्षदानं एकूण 152 किलो वजन उचलत कांस्यपदकावर कब्जा केला. व्हिएतनामच्या माय फुओंग खोंगनं एकूण 166 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. तिनं स्नॅचमध्ये 78 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 88 किलो वजन उचललं. तर, इंडोनेशियाच्या सिती नफिसातुल हरिरोहनं एकूण 162 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावलं. तिनं स्नॅचमध्ये 71 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 91 किलो वजन उचललं.