Advertisement

नोबेल शांतता पुरस्कार एक व्यक्ती आणि दोन संस्थांना जाहीर

प्रजापत्र | Friday, 07/10/2022
बातमी शेअर करा

यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार (नोबेल शांतता पुरस्कार 2022) एक व्यक्ती आणि दोन संस्थांना जाहीर झाला आहे. बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते अ‍ॅलिस बिआलित्स्के यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

 

अ‍ॅलिस यांच्याव्यतिरिक्त, रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना देण्यात आले आहे. या दोन्ही संस्था मानवी हक्कांसाठी काम करतात.

 

नोबेल सप्ताह 3 ऑक्टोबरपासून सुरू झाला असून तो 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. 7 दिवसांत एकूण 6 पारितोषिकांची घोषणा होते. अखेरीस अर्थशास्त्र श्रेणीतील नोबेल जाहीर होतो. या आठवड्यात केवळ पुरस्कार जिंकणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेची नावे जाहीर केली जातील. डिसेंबरमध्ये त्यांना प्रत्यक्षात पारितोषिके दिली जातील.
 

Advertisement

Advertisement