Advertisement

भौतिक शास्त्रातील संशोधनासाठी तीन शास्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर

प्रजापत्र | Tuesday, 04/10/2022
बातमी शेअर करा

सोमवापासून २०२२ या वर्षातील नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. सोमवारी स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर आज भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर यांना एकमेकांमध्ये अडकलेल्या फोटॉन ( Entangled Photons ) संदर्भातील अभ्यासासाठी यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

 

 

अलेन आस्पेक्ट हे फ्रान्सचे मधील स्वेले विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आहेत. तर जॉन एफ क्लॉजर हे अमेरिकेतील शास्रज्ञ आणि अँटोन झेलिंगर हे ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.

 

 

दरम्यान, गेल्या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार सौकुरो मानाबे (जपान), क्लोस हेसलमन (जर्मनी) आणि जॉर्जिओ पॅरिसी (इटली) यांना देण्यात आला होता.
 

Advertisement

Advertisement