जम्मू काश्मीर कारागृहाचे महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. जम्मूतील उदयवाला भागातील एका घरात लोहिया यांचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक तपासानुसार लोहिया यांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
या घटनेनंतर घरातील नोकर फरार झाले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ३ ऑगस्ट २०२२ मध्ये हेमंत लोहिया यांची जम्मू काश्मीरच्या कारागृह महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच लोहिया यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
बातमी शेअर करा