आजकाल ऑनलाइन व्यवहारांमध्ये यूपीआयद्वारे बरेच व्यवहार केले जात आहेत. ऑनलाइन पैशाची देवाण घेवाण करण्यासाठी यूपीआय हे सर्वात सोपे आणि लोकप्रिय माध्यम आहे. एखाद्यावेळी चुकून वेगळ्याच खात्यावर पैसे पाठवले जाते. परंतु या चुकीनंतर घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. आता आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले असून यामुळे पैसे चुकून चुकीच्या खात्यात हस्तांतरित झाल्यास, ४८ तासांच्या आत परत मिळवू शकता.
आरबीआयने सांगितले ‘हे’ नवीन मार्गदर्शक तत्त्वे
यूपीआय मधून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला मिळणारा मेसेज सेव्ह करा. जर मेसेज डिलीट झाला तर पैसे रिफंड करण्यात खूप अडचणी येतील. व्यवहार पुष्टीकरण संदेशामध्ये PBBL क्रमांक असतो.
पैसे परत करण्याच्या प्रक्रियेसाठी हे आवश्यक आहे. आरबीआयने आपल्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे की, जर तुम्ही चुकून इतर कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, तर तुम्ही bankingombudsman.rbi.org.in वर जाऊन तक्रार करू शकता.
या प्रक्रियेनंतर, तुम्हाला बँकेकडे अर्ज देखील लिहावा लागेल. अर्जामध्ये तुम्हाला खाते क्रमांक, नाव, ज्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.