Advertisement

प्रगती पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

प्रजापत्र | Tuesday, 27/09/2022
बातमी शेअर करा

उस्मानाबाद : प्रगती सहकारी पतसंस्थेच्या 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन नानासाहेब पाटील, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ आणि समाजसेवक डॉ. राघवेंद्र डंबळ, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश पोतदार आणि जिल्हा सहकार विकास अधिकारी मधुकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. 

 

यावेळी वार्षिक अहवालाचे वाचन करताना त्यांनी अहवाल वर्षातील संस्थेचा आर्थिक लेखाजोखा मांडला. मार्च 2022 अखेर संस्थेची सभासद संख्या 3671 असुन वसुल भागभांडवल 4 कोटी 12 लाख रुपये आहे. संस्थेच्या ठेवी 56 कोटी रुपये आहेत तर संस्थेने स्वनिधीतुन 38 कोटींचे कर्जवाटप केले आहे. संस्थेने विविध बॅंकामध्ये 35 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून संस्थेला मार्च 2022 अखेर 1कोटी 74 लाख 31 हजार 772 रुपये इतका निव्वळ नफा झाला असून सभासदांना 12% लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाच्या वतीने करत असल्याचे जाहीर केले. त्याला उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. 

 

यावेळी सहकार विकास अधिकारी जाधव यांनी शासनाचे सहकार विषयक धोरण आणि सहकारी पतसंस्थाचे कामकाज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मकरंद राजेनिंबाळकर आणि महेश पोतदार यांनी संस्थेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले आणि या संचालक मंडळाच्या सुरुवातीपासूनच्या धडपडीचे साक्षीदार असुन संचालक मंडळाच्या सचोटीने आणि काटकसरीने केलेल्या कारभाराचे कौतुक केले.

Advertisement

Advertisement