Advertisement

बीड जिल्हा वासियांच्या अनेक दशकांची स्वप्नपूर्ती-ढाकणे

प्रजापत्र | Friday, 23/09/2022
बातमी शेअर करा

बीड-बीड जिल्हावासियांचे अनेक वर्षांचे रेल्वे सेवेचे स्वप्न अखेर आज साकार झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यू आष्टी- अहमदनगर रेल्वेसेवेस आज दुपारी हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केले. आष्टी येथून सुटणाऱ्या पहिल्या डेमू पॅसेंजर ट्रेनला मुख्यमंत्री शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच पहिल्या न्यू आष्टी ते अहमदनगर टप्प्यातील ६६ किलोमीटरची ब्रॉडगेज लाईन प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. या मार्गावर सहा स्थानके आहेत. आठवड्यात रविवार सोडून सहा दिवस रेल्वे या मार्गावर धावेल.दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न शुक्रवारी वास्तवात उतरल्याचे प्रतिक्रिया वंजारी ओबीसी विकास महासंघाचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दादासाहेब ढाकणे यांनी व्यक्त केली. 
         ढाकणे म्हणाले,परळीसारखीच बीडमध्ये ही रेल्वे धावावी यासाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे सातत्याने प्रयत्नशील असायचे.अखेर त्यांचे स्वप्न आज काही प्रमाणात पूर्ण झाले आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी आष्टी ते नगर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.सध्या पहिला टप्पा रेल्वेच्या कामाचा पूर्ण झाला असून दुसरा टप्पाही लवकरच पूर्ण होणार आहे.  

 

Advertisement

Advertisement