Advertisement

स्व मुंडेंच स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद - मुख्यमंत्री शिंदे !

प्रजापत्र | Friday, 23/09/2022
बातमी शेअर करा

आष्टी – नगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या नगर ते आष्टी या पहिल्या टप्याच लोकार्पण झाल्याने स्व गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजप युतीचे सरकार हे डबल इंजिन सरकार असल्यामुळे यापुढे विकास कामांना वेग येईल असा विश्वास व्यक्त केला

 

आष्टी येथे अहमदनगर ते आष्टी या रेल्वे मार्गाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील खासदार प्रीतम मुंडे माजी मंत्री पंकजा मुंडे खासदार सुजय विखे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

 

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी आष्टी ते नगर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा रेल्वे मार्ग स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची स्वप्नपूर्ती आहे या रेल्वे मार्गामुळे बीड आणि अहमदनगर जिल्ह्याचा विकास वेगाने होईल असा विश्वास व्यक्त केला राज्यातील सर्वच विकास कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

 

नवीन आष्टी – अहमदनगर नवीन लाईनची पार्श्वभूमी आणि फायदे :

• 66 किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन 261 किमी अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे ज्यामध्ये भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात 50-50 खर्चाचा वाटा आहे.

• डेमू (DEMU) सेवा नवीन आष्टी – अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.

• यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक – आर्थिक विकासाला चालना मिळेल.

 

 

 

 

अशी धावणार रेल्वे…

• डेमू ट्रेन (DEMU train) अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी (New Ashti) येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगर (Ahemadnagar) येथे पोहोचेल. ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे.

 

 

हे आहेत रेल्वेचे थांबे (Station)…

• कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.

Advertisement

Advertisement