Advertisement

 २८ वर्षीय महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 25/04/2024
बातमी शेअर करा

बीड - मम्मी मला माफ कर परत कधीच तुझ्या पोटी जन्म घेणार नाही, असे म्हणत चिठ्ठी लिहून एका २८ वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील अंकुशनगर भागात घडली. दरम्यान नवरा आणि सासुच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचे चिठ्ठीमध्ये तसा उल्लेख आहे. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.

 

  अश्‍विनी शिंदे (कांडेकर) वय २८ वर्षे या विवाहित महिलेने शहरातील अंकुशनगर भागातील एका विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेने चिठ्ठी लिहून ठेवली. त्या चिठ्ठीमध्ये ‘माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, मी केलेल्या चुकीची मी भोगायला तयार आहे, माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केले, मम्मी मला माफ कर, परत कधीच तुझ्या पोटी जन्म घेणार नाही, हे माझं दरिद्री नशिब आहे म्हणून मला माफ कर, परीक्षीत मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला खप त्रास झाला, पण तुम्ही तुमच्या आईकडून बोलत होता, मला एकांतात कधीच दिलासादायक शब्द बोलले नाही,’  यासह इतर उल्लेख चिठ्ठीमध्ये आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता
 

Advertisement

Advertisement