Advertisement

निवडणुकीच्या बंदोबस्ताला मारली दांडी

प्रजापत्र | Thursday, 25/04/2024
बातमी शेअर करा

बीड-लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरु असून शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणुकीशी संबंधित कामे देण्यात आली आहेत.बीड जिल्ह्यात ३७० अंमलदार यांना वर्धा येथे निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पाठविण्याबाबत आदेश होते.यावेळी दोन अंमलदारांनी सदर बंदोबस्ताच्या ठिकाणी हजेरी न लावल्याने बीड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणात १८८ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी अंमलदारांनी मारलेली दांडी  आता चांगलीच अंगलट आल्याचे चित्र आहे. 
            देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे वातावरण तापलेले आहे.वर्धा येथे बीड जिल्ह्यातून निवडणूक बंदोबस्तासाठी ३७० अंमलदार यांना हजर राहण्याबाबत आदेश देण्यात आले होते.यातील पाटोदा पोलीस ठाण्याचे अंमलदार संजय दशरथ गांगुर्डे व परळीच्या संभाजी नगर ठाण्यातील हरिदास शामराव गित्ते यांनी  बंदोबस्तला दांडी मारली असल्याचा प्रकार समोर आला.पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेल्या आदेशाचे दोन्ही अंमलदार यांनी पालन न केल्याने जिल्हा विशेष शाखेचे शरद कोंडीराम निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात १८८ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement