अंबाजोगाई दि.२५ (प्रतिनिधी)-अंबाजोगाई-लातूर महामार्गावर असलेल्या सायगावजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीस दिलेल्या जोराच्या धडकेत युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.२४) रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली.
शेख खलील दादामिया (वय-३८) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.तालुक्यातील सायगावजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीवरुन येत असलेला तरुण शेख खलील दादामिया यास जोराची धडक दिली. या तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.अंबाजोगाई शहरातील वीट उद्योजक शेख दादामिया पाशा यांचा शेख खलील हा मुलगा होता.या घटनेमुळे पेन्शनपुरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलिस करीत आहेत.
बातमी शेअर करा