Advertisement

कोळगावमध्ये विवाहित महिलेचा खून

प्रजापत्र | Friday, 16/09/2022
बातमी शेअर करा

गेवराई दि.१६ (प्रतिनिधी)-विवाहित महिलेचा खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव सासरच्या मंडळीने केला होता. मात्र माहेरच्या मंडळीने आक्रमक भूमिका घेऊन पहाटे तीन वाजता मृतदेह जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर ठेवण्यात आला होता. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली व पुन्हा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे आदेशीत केले. त्यानुसार अंबाजोगाई येथे शवविच्छेदन झाले. शुक्रवारी (दि.१६) दुपारी चकलांबा पोलीस ठाण्यात पतीसह सासु-सासर्‍याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना कोळगाव येथे घडली.

 

 

 

           प्रियंका भाऊसाहेब येडे (रा. कोळगाव, वय 28 वर्षे) या महिलेचा गुरुवारी (दि.१५) संशयास्पद मृत्यु झाला. महिलेने आत्महत्या केल्याचे सासरच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र माहेरच्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. आमच्या मुलीचा खून झाल्याचे सांगून खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवातील टाळाटाळ केली.त्यामुळे पहाटे तीन वाजता मृतदेह जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयसामोर ठेवण्यात आला होता. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून शवविच्छेदन अंबाजोगाईच्या रुग्णालयात करून घेऊ, असे आश्‍वासन दिले व अंबाजोगाई रुग्णालयात शुक्रवारी (दि.१६) सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर आरोपी पतीसह सासु-सासर्‍याविरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

Advertisement