परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-
मामा आणि भाच्याचं नातं सर्वश्रूत आहे. भाच्याला मामाच्या गावाला जाण्याची ओढ अशी काही जिवावर बेतेल असं वाटलं नसेल. पण, अशी घटना परळी तालुक्यातील नागापूर कॅम्प येथे घडली आहे. लक्ष्मण चिमणकर वय २७ वर्षे हा गायरान जमिनीच्या वादावरून आईला सतत त्रास देत असल्याने, त्याची बहीण सुरेखा विकास करंजकर व भाचा कु. कार्तिक विकास करंजकर , राहणार युसुफवडगाव तालुका केज काल दि.१०/०९/२२ रोजी बहीण आपल्या माहेरी नागापूर येथे व भाच्चा आजोळी आला. आरोपी लक्ष्मण चिमणकर हा गायरान जमिनीवरून आईला त्रास देत होता म्हणून बहीण ही माहेरी आली होती. तिने आरोपी भावाला काल रात्री भरपूर समजावून सांगितले. दोघा बहिण भावात भांडण झाले. त्याचा राग मनात धरून भावाने (लक्ष्मण चिमणकर) पहाटेच बहिणीच्या चार वर्षाच्या मुलाचा स्वतः:च्या भाच्याचा कुमार कार्तिकचा धारदार हत्याराने गळ्यावर व मानेवर वार करून खून केला.
मुलगा ओरडल्यामुळे आईने त्याला तात्काळ सरकारी दवाखाना परळी येथे त्यानंतर सरकारी दवाखाना अंबाजोगाई व त्यानंतर सरकारी दवाखाना लातूर येथे उपचाराकरिता घेऊन गेली. परंतु , मुलगा वाचू शकला नाही. आरोपी मामाला ताब्यात घेतले आहे. नागपूर कॅम्प परिसरात व तालुक्यात मामा भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याने, परिसरात मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावर परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मारुती मुंडे व स्टाफ हजर झाले. अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती नेरकर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून, ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मारोती मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील तपास अधिकारी पीएसआय पोळ हे करीत आहेत.