Advertisement

दहा वर्षीय मुलीची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 08/08/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.८ (वार्ताहर) - दहा वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे रविवारी धारुरात उघडकीस आले. शहरातील केज रोडवर राहणाऱ्या एका सालगड्याच्या घरात सदर प्रकार घडला आहे. भाग्यश्री भगवान गांगरडे (वय १०) असे मृत मुलीचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, धारुर शहरातील केज रोडवर भगवान गांगरडे यांचे कुटूंब सालगडी म्हणून शेतातच राहतात. रविवारी भगवान गांगरडे आपल्या पत्नीसह शेतात कामावर गेले होते. त्यांना एक मुलगा व दोन मुली असून हे तिन्ही बहिण भावंड यावेळी घरीच होते. काही वेळानंतर घरातील आडूला यातील भाग्यश्री या दहा वर्षीय मुलीने गळफास घेतला.

 

घरातील इतर दोघा बहिण भावाच्या सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला. यानंतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीच्या आई वडीलांना सदर प्रकाराची माहिती दिली. घटनेची माहिती धारुर पोलिसांना मिळताच घटनेचा पंचनामा करण्यात आला. सदर मुलीने आत्महत्या का केली याचे कारण समोर आले नाही.

Advertisement

Advertisement